ऐसा ज्याचा एक भाव ।
2355.
ऐसा ज्याचा एक भाव । तेथे नाही द्वैता ठाव ॥१॥
द्वैत अद्वैत हारपलें । अवघे एकरुप जाहलें ॥२॥
संकल्प विकल्प विराला । अवघा देही देव जाहला ॥३॥
एका जनार्दनी ठाव । स्वयमेव भरला देव ॥४॥