वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

तुजविण कोणा । शरण जा

🙏 3. संत तुकाराम · ABH-078115 · अभंग क्र. २३६२

2362.
तुजविण कोणा । शरण जाऊ नारायणा ॥१॥
ऐसा न देखे मी कोणी । तुजा तिही त्रिभुवनी ॥धृपद॥
पाहिली पुराणे । धांडोळिली दरुषणे ॥२॥
तुका म्हणे ठायी । जडून ठेलो तुझ्या पायी ॥३॥

अर्थ :
हे नारायणा तुझ्या वाचून मी कुणाला शरण जाऊ? कारण तुझ्यासारखा सर्व शक्तीवान, सामर्थ्यवान त्रिभुवनात दुसरा मला कोणीही दिसत नाही. मी सर्व पुराणे पाहिले, सर्व वेदशास्त्र धुंडाळले, दर्शनाचा ही विचार केला परंतु तुझ्या सारखा कोणी ही मला दिसला नाही. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून तर देवा मी तुझ्या पायाच्या ठिकाणी जडून राहिलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग