एका देहामाजीं दोघे प
2371.
एका देहामाजीं दोघे पै वसती
एका देहामाजीं दोघे पै वसती । एकासी बंधन एका मुक्त गति ॥१॥
पहा हो समर्थ करी तैसे होय । कोण त्यासी पाहे वक्र दृष्टी ॥२॥
पापपुण्य दोन्ही भोगवी एक हाती । ऐशी आहे गति अतर्क्य ते ॥३॥
एका जनार्दनी जनी जनार्दन । तयासी नमन सर्वभावे ॥४॥
