वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

न बोलावे ऐसे जनासी उ

🙏 3. संत तुकाराम · ABH-077907 · अभंग क्र. २३८६

2386.
न बोलावे ऐसे जनासी उत्तर । करितो विचार बहु वेळा ॥१॥
कोण पाप आड ठाकते येऊन । पालटिति गुण अंतरीचा ॥धृपद॥
संसारा हाती सोडवूनि गळा । का हे अवकळा येती पुढे ॥२॥
तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करू काय पांडुरंगा ॥३॥

अर्थ :
सामान्यतः कोणत्याही लोकांशी मी बोलू नये असाच मी खूप वेळा विचार करतो. परंतु कोणते पाप आडवे येऊन उभा राहते कुणास ठाऊक माझ्या अंतरंगातील विचार गुण एकदमच बदलून जातो. संसाराच्या हातून माझा गळा मी सोडून घेतला आहे तरीदेखील माझ्यापुढे अशी अवकळा का येते हे मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या सेवेत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडथळा येतोच आता याला मी काय करू?
5:40

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग