बोलिजे ते नव्हे । बो
2404.
बोलिजे ते नव्हे । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहता कवण आहे ॥१॥
हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारी ॥२॥
दृश्य तो जाला नाही । दृश्यमात्रें त्यातेंच पाही । आहे नाही ऐसे जे कांही । प्रकाशे त्याच्याच ठायी ॥३॥
एकपणे पाहे अनेक । अनेकीं आहे एक । एक ना नव्हे आणीक । एक जनार्दनीक तोचि देख ॥४॥
