वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आलिया अतीता म्हणतसा

🙏 3. संत तुकाराम · ABH-078148 · अभंग क्र. २३५८

2358.
आलिया अतीता म्हणतसा पुढे । आपुले रोकडे सत्त्व जाय ॥१॥
काय त्याचा भार घेऊनि मस्तकी । हीनकर्मी लोकी म्हणावया ॥धृपद॥
दारी हाका कैसे करवते भोजन । रुची तरि अन्न कैसे देते ॥२॥
तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शक्ती उदार काय जाली ॥३॥

अर्थ :
लोकहो आपल्या दारात जर कोणी अतिथी आला आणि त्याला, पुढे चालता हो असे जर कोणी म्हटले तर आपले पुण्य तात्काळ नाहीसे होऊन सत्व नष्ट होते. याचकाचा अपमान करून त्याचा भार आपल्या मस्तकावर तुम्ही का घेता लोकांनी आपल्याला क्रिया नष्ट म्हणून घेण्यासाठीच असे करता कि काय? एक घास अन्नासाठी याचक दारात हाका मारतो आणि तुम्ही आत मध्ये भोजन करता तरीही तुम्हाला ते अन्न पचते कसे काय आणि ते अन्न तुम्हाला गोडी तरी देते कासे काय? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जगाला तर आम्ही फार उदार आहोत असे आपल्या दोन्ही हाताचे ध्वज उभारून सांगता मग आता त्या उदारपणाच्या शक्तीला काय झाले आहे?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग