दुर्जनाचा मान । सुखे
2078.
दुर्जनाचा मान । सुखे करावा खंडण ॥१॥
लाता हाणोनिया वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥धृपद॥
बहुता पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥
तुका म्हणे नखे । काढुनि टाकिजेती सुखे ॥३॥
अर्थ :
दुर्जन लोकांचा नेहमी आपमान करत राहावा त्यांची खंडना करीत रहावे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पाप होत नसते. वाटेवर पडलेला दगड पायाने लाथाळून बाजूला करून वाट स्वच्छ करावी. दृष्ट व्यक्ती अनेक सज्जनांना पिडा देतो त्रास देतो त्यामुळे त्यांचा विटाळ धरावा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे आपण आपल्या हातापायाची नखे वाढली की आनंदाने काढून टाकतो त्याप्रमाणे दुष्ट लोकांचाही आपण त्याग करावा.
