वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

यमपुरी त्यांणी वसविल

🙏 3. संत तुकाराम · ABH-078013 · अभंग क्र. २०६६

2066.
यमपुरी त्यांणी वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥
अवघड कोणी न करी सांगता । सुलभ बहुता गोड वाटे ॥धृपद॥
काय ते नेणते होते मागे ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥
द्रव्य दारा कोणे स्थापियेले धन । पिंडाचे पाळण विषयभोग ॥३॥
तुका म्हणे दोही ठायी हा फजित । पावे यमदूतजना हाती ॥४॥

अर्थ :
ज्यांनी भजन या विधीचा उच्छेद केला आहे त्यांनीच खरी यमपुरी वसविलेली आहे असे जाणवावे. जे अवघड आहे ते कोणीही करत नाही परंतु जे खूप सोपे आहे म्हणजे दुसर्‍याला त्रास देणे दुष्टपणाने वागणे हे करताना फार गोड वाटते. पूर्वी ऋषीनी लोकांनी कसे वागावे कसे आचरण करावे हे ग्रंथात लिहून ठेवले मग ते ऋषी काय अज्ञानी होते काय? द्रव्य कमवावे आप्तेष्ट नातेवाईकाना जपावे धन कमवावे देहाचे पालन पोषण करावे विषय भोग घ्यावे असे कोणत्याही ऋषीने यापूर्वी कोणत्याही साधनेद्वारा स्थापना केली होती की काय? तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याची दोन्हीही ठिकाणी फजिती होते म्हणजे संतांच्या ठिकाणी चांगले कर्म न केले म्हणून आणि यमदुताच्या ठिकाणी या पूर्वी खूप पाप केले म्हणून फजिती होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग