गणपति पूजिले ते दोंद
2078.
गणपति पूजिले ते दोंदिल भले | वैष्णव न भले अरे मना ॥१॥
सीतळा पूजिली ते म्ह॒इसे भले | वेष्णव न भले अरे मना ॥२॥
मैराळ पूजिले ते वाघे भले | वेष्णव न भले अरे मना ॥३॥
सूर्य पुजिले ते घोडे भळे | वैष्णव न भले अरे मना ॥४॥
नामा म्हणे जे का विठठुली भजिले | ते वैष्णव भले सत्य मना ॥५॥
