वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

किती तुजपाशी देऊ परि

🙏 3. संत तुकाराम · ABH-078070 · अभंग क्र. २०८६

2086.
किती तुजपाशी देऊ परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥१॥
आता माझे हाती देई हित । करी माझे चित्त समाधान ॥धृपद॥
राग आला तरी कापू नये मान । बाळा मायेविण कोण दुजे ॥२॥
तुका म्हणे तैसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचे ॥३॥

अर्थ :
हे पांडुरंगा तु सर्वांचे अंतकरण जाणतोस मग मी माझा परिहार तरी तुला किती वेळ देत राहू? आता माझे हीत माझ्या तु हातात दे आणि माझ्या चित्ताचे समाधान कर. कितीही राग आला तरी आईने बाळाची मान कापू नये कारण आई शिवाय त्या बाळाला कोण प्रेम देणारे आहे दुसरे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु जर माझे हीत केले नाही तर समर्थाचे बाळ भिक मागत आहे असाच तुझा लौकिक सगळीकडे होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग