काय जाणो वेद । आम्ही
2075.
काय जाणो वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥
एक रूप तुझे मनी । धरूनि राहिलो चिंतनी ॥धृपद॥
कोठे अधिकार । नाही रानट विचार ॥२॥
तुका म्हणे दीना । नुपेक्षावे नारायणा ॥३॥
अर्थ :
हे देवा आम्ही वेद तरी काय जाणणार आहोत आणि शास्त्रातील प्रक्रिया देखील आम्हाला काय माहित आहेत? अहो केवळ आम्ही देवा तुमचे ते एक रूपच आमच्या मनात धारण केले आहे आणि त्याचेच चिंतन आम्ही करत आहोत. अहो आम्हाला कसला अधिकार आहे आम्ही तर रानटी विचार करणारे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही दिन आहोत त्यामुळे हे नारायणा तु आमची उपेक्षा करू नकोस.
