अवघे ते दैवाचे । विठ
2077.
अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे ॥१॥
अवघा धंदा दुजा नाही । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
अवघा संसार करिती । वाचे अवघे विठ्ठल म्हणती ॥३॥
अवघी कर्मे घडलीं तया । अवघे विठ्ठलाचि पाया ॥४॥
अवघा एका जनार्दनी । अवघा जनी जनार्दनी ॥५॥
