धन्य धन्य विठ्ठल देव
2067.
धन्य धन्य विठ्ठल देव । पाहता निरसे भेव काळाचे ॥१॥
जाउनी घाला पायी मिठी । उदार हा जगजेठी ॥२॥
दरुशने तारी जडजीव । निवारी भेव यमाचें ॥३॥
शरण एका जनार्दनी । ध्यानीं मनी विठ्ठल ॥४॥