लाजो नको मना हरीच्या
2081.
लाजो नको मना हरीच्या कीतेना | संसार पाहुणा दो दिवसांचा ॥१॥
कंठी नाही आइती म्हणोनि सांड नको ज्योति | इतुकिये भ्रान्ति पडू नको ॥२॥
बाळकाचे बोळे माउली प्रीति करी | तैसी कीति हरी परिसे चिते ॥३॥
भलतिया परी बोळे बा श्रीहरी | तो भवसागरी तारील जाणा ॥४॥
येणे तारुण्यपणे भ्रमलासि झणे | भोगिसी पतने जन्मांतरी ॥५॥
तू होय मागता हरी होय दाता | शरण जाई अनंता म्हणे नामा ॥६॥
