भक्त देव एके ठायी ते
2086.
भक्त देव एके ठायी ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊ तेथे ॥१॥
पाहू चरनकमळ वोवाळू श्रीमुख । होईल तेणे सुख चौदेहांसी ॥२॥
संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥
एका जनार्दनी आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥
