चैतन्याचा खेळ एकवट ब
2097.
चैतन्याचा खेळ एकवट ब्रह्म | तिर्गुणासी गुण खूप जाहले ॥१॥
चैतन्य त्या कळा रूपा आले संत | निर्गुणाचा हेत रामकृष्ण ॥२॥
खेळ मांडियेला गोल्हाट शिखरी | गोलांगुळांगुळी समाधिस्थ ॥३॥
समाधी साधन अखंड उन्मनी | औटपीठ ध्वनी नाद होय ॥४॥
नामा म्हणे तैथे चौक्या ज्या रंगल्या | अरंग मिरवल्या संतसंगे ॥५॥
