वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

वाचे विठ्ठल नाही । त

🙏 3. संत तुकाराम · ABH-078223 · अभंग क्र. २०६८

2068.
वाचे विठ्ठल नाही । तोचि प्रेतरूप पाही ॥१॥
धिग त्याचे ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥धृपद॥
न बैसे कीर्तनी । गुण नाइके जो कानी ॥२॥
जाता कांटाळे देउळा । तोचि सुना मुखकाळा ॥३॥
हरीभक्तीविण । त्याचे जळो शाहाणपण ॥४॥
तुका म्हणे तेणे । वंशा आणियेले उणे ॥५॥

अर्थ :
ज्याच्या वाचेला विठ्ठल नामच येत नाही तो जिवंत नसून प्रेत रूपच आहे. धिक्कार असो त्याच्या जिवंतपणाचा कारण त्याचा भार देखील पृथ्वीला सहन होत नाही. अहो हे काही लोक असे आहेत की जे कीर्तनातील बसत नाही आणि हरीचे गुणदेखील कानांनी ऐकत नाही. अशा माणसांना देवळात जाण्याचा देखील कंटाळा येतो त्याचे मुख म्हणजे काळ तोंड्या कुत्र्या प्रमाणे आहे. कोणी कितीही विद्वान असो पंडित असो वाचक असो परंतु त्याच्या जर चित्तात हरी भक्ती नसेल तर त्याच्या शहाणपणाला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात असे माणसे आपल्याला वंशाला कमीपणा आणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग