नागर गोमटें रुप ते ग
2068.
नागर गोमटें रुप ते गोजिरे । उभे ते साजिरे भीमातटीं ॥१॥
पहाता विश्रांति देहा होय शांती । अनुपम्य मूर्ति विठ्ठल देव ॥२॥
भक्ताचिया काजा राहिलासे उभा । कैवाल्याचा गाभा बालमूर्ति ॥३॥
आनंदाचा कंद उभा परमानंद । एका जनार्दनी छंद मज त्याचा ॥४॥
