समाधिस्थ सदा राहे सम
2094.
समाधिस्थ सदा राहे समाधान | निःशब्द म्हणणे याचिलागी ॥१॥
राम ते समात नव्हती समाधान | समाधि बैसणे एकचित्ते ॥२॥
उत्मनी उपासना प्रेमाची दाटणी | आत्मरूप जनी दिसतसे ॥३॥
नामा म्हणे रूप डोळ्यांतील बाहुली | तीचि जगी जाहली जगदाकार ॥४॥
