उपवास पारणे न लागे स
2097.
उपवास पारणे न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी ॥१॥
आम्हा विष्णुदासा कळलेंसे वर्म । मुखी गावे नाम हाती टाळी ॥२॥
आनंदे बागडे जाती पंढरीसी । पहाती विठोबासी दृष्टीभरी ॥३॥
एका जनार्दनी मनाचे उन्मन । एका दरुशने मुक्तिपद ॥४॥
