अरे अलगटा माझिया तू
2067.
अरे अलगटा माझिया तू मना | किती रानोरांना हिंडविसी ॥१॥
रे विठोबाचे पायी दृढ घाली मिठी | का होतसी हिपुटी वायांविण ॥२॥
क्रिया कम धर्म तुज काय चाड | जवळी असता गोड प्रेमसुख ॥३॥
संकल्प विकल्प सांडी तू समूळ | राहे रे निश्चळ क्षणभरी ॥४॥
आपुले निजहित जाण त् त्वरित | वासनारहित होई वेगी ॥५॥
|नामा म्हणे मज पहिलेंच कळते | सोसणे न लगते गर्भवास ॥६॥
