वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नका धरू कोणी । राग व

🙏 3. संत तुकाराम · ABH-077924 · अभंग क्र. २०७९

2079.
नका धरू कोणी । राग वचनाचा मनी ॥१॥
येथे बहुतांचे हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥धृपद॥
नाही केली निंदा । आह्मी दुसिलेसे भेदा ॥२॥
तुका म्हणे मज । येणे विण काय काज ॥३॥

अर्थ :
मी बोललेल्या वाक्याचा कोणीही आपल्या मनामध्ये द्वेष नका धरू. माझ्या बोलण्याने खूप जणांची हित होणार आहे त्यामुळे सर्वांनी आपले चित्त शुद्ध करून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. मी कोणाचीही निंदा केली नाही केवळ त्या मनुष्याच्या आतील जे विकार आहेत त्यांनाच मी दूषण दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाहीतर माझे या वाचून काही आडले आहे की काय?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग