परब्रह्म विश्वाकारे
2086.
परब्रह्म विश्वाकारे अवतरले भक््तिकाजा |मूर्ति सुनीळु सांवळी केशिराजु स्वामी माझा ॥१॥
गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना |पाविजे प्रेमपद निर्मळ होत ज्ञाना ॥२॥
मत हे बोवरी असे सुमताचे चित्रशाळी |दोन्ही चरण सुकुमारे वरी अष्टदळ कमळी ॥३॥
संध्याराग रातळे सुनीळ दिशातळवटी |ध्वजवज्तांकुषा चिन्हे साजती गोमटी ॥४॥
इंदिरा तिथे योकली तिच्या सुखा नाही पारु |ते चरणी स्थिर जाली म्हणोनी म्हणती लक्ष्मीवरु ॥५॥
घवघवीत वांकी चरणी ब्रीदाचा तोडरु |नखप्रभा फांकली तिने लोपला दिनकरु ॥६॥
सृष्टी घडीत मोडीत उत्पत्ति स्थिति प्रलम अवघे नवे |तो चतुर्मुख ब्रह्मा चरण पूजितो स्वभावे ॥७॥
देवाधिदेव शंभू कैलासींचा राणा |गंगा मुगुटि धरिली तिचा जन्म अंगुळीचरणा |॥८॥
दैत्यकुळी जन्मला देव पळती ज्यांचेनि धाके |पावो पाठिसी लागला म्हणउनि दारबंटा राखे ॥९॥
शेष वणिता श्रमला वेद परतले माघारी |नामा म्हणे अरे भना जरी याचे चरण धरी झडकरी ॥१०॥
