गोमटेंक नागर कटी धरु
2096.
गोमटेंक नागर कटी धरुनि कर । उभा तो सुकुमार वैकुंठींचा ॥१॥
रूपाचें रूपस पाहता सावकाश । धणी धाय मनास तया पाहता ॥२॥
नाठवे कल्पना मनाचिया मना । बुद्धि ते चरणा विनटली ॥३॥
एका जनार्दनी इंद्रियांची चाली । सर्व हारपली पंढरी पाहता ॥४॥
