घणीवरी ध्यान करी कां
2088.
घणीवरी ध्यान करी कांरे मना | या सुखनिधाना विठोबाच्या ॥१॥
पढीये तैसे सुख आहे त्यांचे पायी | अनुसरोनि 'पाही एकवेळ ॥२॥
श्रीमुख साजिरे पाही दृष्टीभरी | जीवित्वाचे करी लिंबलोण ॥३॥
जेणे लक्ष धरोनि आहे पुंडलीक | तोचि भाव एक दृढ धरी ॥४॥
न लगे गुरुमंत्र न लगे जपतप | उघडे स्वरूप विटेवरी ॥५॥
नामा म्हणे धरी निकट चरण | तरीच प्रेमखूण पावसील ॥६॥
