वामांगी वाहुली तुर्य
2095.
वामांगी वाहुली तुर्या दावी कळा | ते लक्षी पाउला रामरूप ॥१॥
माया निजरूप दक्षिणांगी बसे | तुर्याचा हा भास मावळला ॥२॥
मी माया म्हणता पाहे आपणाते | आत्माराम तेथे ज्ञानजळी ॥३॥
मामा म्हणे ज्ञात मायरा ते आपण | दृष्टीचे देखणे आत्मरूप ॥४॥
