देवा तुझे मी चाटारू
2082.
देवा तुझे मी चाटारू | सहसखत्रा एका हाकी करू |लाभ होतसे अपारू | घडी घडीये माझारी ॥१॥
तुझ्या पायाची जोडी | त्यासि होतसे परवडी |आवारू न लाहे एक घडी | नंदाप्रिय होतसे ॥२॥
मुदळ पुसतसे वेळोवेळा | हा मना रे. पापी चांडाळा |सांग चोविसा आगळा | कवणेपरी न धाय ॥३॥
वासना मागतसे तुज | हे द्यावी जी मज |दाटणी होतसे सहज | म्हणवोनि मज अंकितसे ॥४॥
तामा म्हणे जी दातारा | तुझिये भेटी सारंगधरा |लाभ होतसे अपारा | घडी घडीये विठुला ॥५॥
