वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

ब्रह्म सर्वगत सदा सम

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086120 · अभंग क्र. १६१०

1610.
ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथे आनु नाही विषम । ऐसे जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥
ऐसे कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बाधू । ज्यासी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमनांदी उद्धोधु ॥२॥
पवना घालवेल पालाण । पायी चढवेल गगन । भुत भविष्य कळो येईल वर्तमान । परी त्य साधूचें न कळे महिमान ॥३॥
चंद्रामृत सुखे सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल । बाह्मा हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥
जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान । ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचे मुळ हे साधुजन ॥५॥
निजवृत्तीचा करवेल विरोधु । जीवाशिवाचा भोगवेल आनंदु । एका जनार्दनी निजसाधु । त्याच्या दर्शने तुटे भवबंधु ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग