तुझिया पायांचे प्रमा
1609.
तुझिया पायांचे प्रमाण है माझे | चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥
संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटी | रामकृष्ण कंठी माळ घाल ॥२॥
दुरोनिया देखे गरुडाचे वारिके | गोपाळा सारिखे चतुर्भुज ॥३॥
नामा म्हणे विठो जन्मजन्मांतरी | ऋणि करुनि करी घेई मज ॥४॥
