देवा तुझी अवज्ञा घडे
1621.
देवा तुझी अवज्ञा घडे | तयाचे दास होती वांकुडे |व्याधिविण देह पीडे | बुडे सागरी चितेच्या ॥१॥
देवा तू होसी उदासीन | तरी हांसती सकळक जन |जेथे जाय तेथे होय अपमान | जगाधीन होऊनि ठाके ॥२॥
देवा तू नाहींस जयाचे चित्ती | सोने धरिल्या होये माती |पीक न पिके तयाचे शेतीं| पेंवी पाणी रिघतसे ॥३॥
सेवा करी जयाचे घरी | तींचि होती पाठमोरी |इष्टमित्र सज्जन सोयरी | आप्त वैरी होऊनि ठाके ॥४॥
ठेवा ठेविला चुके आपण | मागतोचि मागे जाण |सत्यास घडे आपदास्तपण | बोले तितुके लटिकेची ॥५॥
ऐसा अनुभव घडला मज | म्हणोनि वा शरण आलो तुज |नामा म्हणे केशिराज | कृपा करी दातारा ॥६॥
