आधी घेई निरपेक्षता ।
1626.
आधी घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथा ॥१॥
निरपेक्ष जेथे घडें । यमकाळ पायी जोडे ॥२॥
निरपेक्षाची आवडी । ब्रह्माज्ञान घाली उडी ॥३॥
निरपेक्षेवांचुन । नाही नाही रे साधन ॥४॥
एका जनार्दनी शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ॥५॥