चरणाचा महिमा । हा तो
1606.
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥
अंध पारखी माणिके । बोलविशी स्पष्ट मुके ॥धृपद॥
काय नाही सत्ता । हाती तुझ्या पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे मूढा । मज चेष्टविले जडा ॥३॥
अर्थ :
हे पुरुषोत्तमा हा तुझ्या चरणाचा महिमा आहे. तो महिमा म्हणजे असा आहे की अंध व्यक्तीला देखील माणिक मोत्याची चांगल्याप्रकारे पारख होऊ शकते आणि मुका व्यक्ती स्पष्ट बोलू शकतो. हे पंढरीनाथा तुझ्या हातात कोणती सत्ता नाही
