देह जावो हेंचि घडी |
1605.
देह जावो हेंचि घडी | पाय हरिचे न सोडी ॥१॥
क्लेश होत नानापरी | वाचे रामकृष्ण हरी ॥२॥
नाचू वैष्णवांचे मेळी | हांक विठ्ठल आरोळी ॥३॥
नामा म्हणे विठोवासी | जे ते घडो या देहासी॥४॥