वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 189. दास्य शरणागत स्थिती

भिऊनि निषिजे समर्थाच

🙏 4. संत नामदेव · ABH-082329 · अभंग क्र. १६१८

1618.
भिऊनि निषिजे समर्थाचे पोटी | विषयांची तो भेटी नको मज ॥१॥
तैसा मी शरण आलो रे केशवा | मज त्वा राखावे पायांतळी ॥२॥
नको उदासीन राखो अभिमान | माझे आगमन विचारी का ॥३॥
तुझेनि होईल तेंच मी मागेन | न सोडी चरण अहर्निशी ॥४॥
अविद्या अपार संचरली देवा | आम्हासि कुढावा नाही कोणी ॥५॥
देवा आता मज नको गर्भवास | नामा विष्णुदास विनवितसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग