चंचळी चंचळ निश्चळी न
1616.
चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
सोपे वर्म परि मन नाही हाती । हा हा भूत चित्ती भ्रम गाढा ॥धृपद॥
रविबिंब नाही तुटत उदका । छायेची ते नका सरी धरू ॥२॥
तुका म्हणे भय धरी रज्जूसाठी । नाही साच पोटी कळले तो ॥३॥
अर्थ :
पाणी उतारावर गतीने तर सारख्या जमिनीवर स्थिर पणाने आणि खाचखळग्यांच्या ठिकाणी खळखळ करत वाहते. ब्रम्हज्ञान प्राप्त होण्याचे वर्म सोपे आहे परंतु मन स्वाधीन नसल्यामुळे ते प्राप्त होत नाही आणि माणसाच्या चित्तात गाढा भ्रम आहे की " मी देह " आहे त्यामुळे ब्रम्हज्ञान होण्यास कठीण जाते. पाण्यात सुर्याचे प्रतिबिंब पडते ते प्रतिबिंब म्हणजे तुम्ही सूर्य समजू नका. तुकाराम महाराज म्हणतात रस्त्यात दोरी पडली की दोरी सर्पा सारखी दिसते मग माणसे त्या दोरी चे भाय मनात धरतात परंतु ते भय कोठपर्यंत असते जोपर्यंत आपल्याला दोरीचे ज्ञान होत नाही तोपर्यंतच.
