तुझिये चरणी असती दोन
1599.
तुझिये चरणी असती दोनी भाव | तरीच हा जीव नरककुंडी ॥१॥
बोल बोले एक मनी असे आणिक | तरी तयासी देख दोनी बाप ॥२॥
तुजविण सुख आणिकांचे मानी | तरी मज जननी दोनी देवा ॥३॥
नामा म्हणे माझा सत्याचा साहाकारी | आस मी न करी आणिकांची ॥४॥
