तुज गीती गाता न येसी
1622.
तुज गीती गाता न येसी पांडुरंगा | प्रेमेंचि दडू गा पायांपाशी ॥१॥
वांकडे तिकडे जैसे आले तैसे | गावया उल्हास उगवला ॥२॥
त्याचि भरे तोंडा आले ते बोलतो | नाम मुखी घेतो अखंडित ॥३॥
तुझा म्हणवितो सांभाळावे देवा | नामया केशवा सर्वकाळ ॥४॥
