वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 189. दास्य शरणागत स्थिती

वासनेचा फांसा पडिला

🙏 4. संत नामदेव · ABH-082331 · अभंग क्र. १६२०

1620.
वासनेचा फांसा पडिला माझे कंठी | हिडलो जगजेठी नाना योनी ॥१॥
सोडवी गा देवा दीनदयानिधी मी एक अपराधी दास तुझा ॥२॥
शरण आलियाचे न पाहसी अवगुण | कृपेचे लक्षण तुज साजे ॥३॥
त्रिभुवनी समर्थ उदार मनाचा | कृपाळू दीनांचा ब्रीद तुझे ॥४॥
गजेंद्र गणिकेची राखिली तुवा लाज | उद्धरिला द्विज अजामेळ ॥५॥
नामा म्हणे देवा अव्हेरिता मज | जगी थोर लाज येईल तूंते ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग