देवा माझे मन ठेवी तु
1624.
देवा माझे मन ठेवी तुझे चरणी | घाली माझे नयनी रूप तुझे ॥१॥
मज या लोकांचा शीण असे मनांत | तुजचि चिंतित हृदयकमळी ॥२॥
चंदनाच्या दूती वेधले तरूवर | सबाह्य अभ्यंतर काय जाले ॥३॥
सरिता सिंधुमाजी मिळोनि लपाली | सागरची जाली एकसरे ॥४॥
लवण जळाचे प्रसिद्धचि असे | ऐक्यभावे वसे न दिसे कांही ॥५॥
नामा म्हणे शरण आलो केशिराजा | ऐसा भावो माझा करी वेगी ॥६॥
