वाट पिकली संतांची ।
1617.
वाट पिकली संतांची । अवघे स्वरुप मुद्दलची ॥१॥
उकल करा लवडसवडीं । मुद्दल देव घडोघडीं ॥२॥
द्वैतांची दाटणी सोडी । वासनेची वासना फेडी ॥३॥
आळ करिता सरळ सात । मन पडेल विचारांत ॥४॥
अखिल गुरुनामाचे । स्थापिले सुरंग भक्तीचे ॥५॥
अंगळू मंगळु नंद भाषा । द्वैत दळणीं वटील घसा ॥६॥
आंत बाहेर एकचि सुत । मुद्दल देता सुखी होत ॥७॥
एका जनार्दनी एकचि भेटी । सरिसी साठी संसारा ॥८॥
