वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 188. पादसेवन चरण सेवा

देवा माझे मन आणि तुझ

🙏 4. संत नामदेव · ABH-082746 · अभंग क्र. १६१४

1614.
देवा माझे मन आणि तुझे चरण | एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥
होणार ते हो गा सुखे पंढरीनाथा | कासया शिणता वायांविण ॥२॥
माझिया अदृष्टी ऐसेंचि मे आहे | सेवावे तुझे पाय जन्मोजन्मी ॥३॥
असता निरंतर येणे अनुसंधाने | प्रारब्ध भोगणे गोड वाटे ॥४॥
हृदयी तुझे रूप वदनी तुझे नाम | बुद्धि हे निष्काम धरिली देवा ॥५॥
नामा म्हणे तुझी पाउले चितिता | जाली कृतकृत्यता जन्मोजन्मी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग