वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 188. पादसेवन चरण सेवा

आता होणार ते होवो पं

🙏 4. संत नामदेव · ABH-082740 · अभंग क्र. १६०२

1602.
आता होणार ते होवो पंढरीनाथा | न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥
हृदयी तुझे ध्यान वाचे जपे नाम | हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥
आम्ही तुझी देवा धरियेली कांस | न करी उदास पांडुरंगा ॥३॥
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला | क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग