वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

जननिया बाळका रे घातल

🙏 3. संत तुकाराम · ABH-090291 · अभंग क्र. १६०८

1608.
जननिया बाळका रे घातले पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारितया चहू कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हाती भाव दावी खेळणा ॥१॥ निजी रे निजी आता । म्हणोनि परिये दे माता । खेळता कष्टलासी बाळा तू रे नेणता । निजी रे निजी आता ॥धृपद॥ खेळता बाहेरि रे मुला लोकांच्या सवे । बागुल काळतोंडा नाही नेतो ते ठावे । खेळता दुश्चित्ता रे देखोनि ते न्यावे । म्हणोनि सांगे तुज शीघ्र वचन पाळावे ॥२॥ संचित मागे तुज शुद्ध होते सांगाती । तेणे तुज वांचविले वेरझारिया हाती । आणीक नेली मागे काय जाणो ती किती । आलासि येथवरी थोर पुण्ये बहुती ॥३॥ खेळता शुक देवा तो रे लागला पाठी । लपाला वरुषे बारा तिये मातेचे पोटी । रिघता बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी जाली स्वामी भेणे रिघे कपाटी ॥४॥ खेळता चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे काप अंगी सुख नाठवे दुःख । आप पर ते ही नाही देहभाव सकळिक ॥५॥ शिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिले हाती । टाकिले तयावरी खुणे गोविला अंती । पावला मायबाप हिरोन घेतला हाती ॥६॥ बांधले अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाके कळले मायबापासी । घातली धाव नेटे वेगी पावला त्यासी । हिरोनि नेली दोघे आपणया ती पासी ॥७॥ धरूनी आठवू रे बाळा राहे निश्चळ । खेळता दुश्चिता रे नको जाऊ बरळ । टोकताहे तुजलागी दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवू रे नेत्री घाली पडळ ॥८॥ ऐसी ती कृपावंते बाळा मोहिले चित्त । सुस्वरे कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणे ते चित्त राहे होऊनिया निवांत । पावती तुका म्हणे नाही विश्वास तो घात ॥९॥

अर्थ :
खेळता शुक देवा तो रे लागला पाठी । लपाला वरुषे बारा तिये मातेचे पोटी । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी जाली स्वामी भेणे रिघे कपाटी ॥४॥ खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे कांप अंगी सुख नाठवें दुःख । आप पर ते ही नाही देहभाव सकळिक ॥५॥ शिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हाती । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हाती ॥६॥ बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाके कळले मायबापासी । घातली धांव नेटे वेगी पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणया ती पासी ॥७॥ धरूनी आठवू रे बाळा राहे निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊ बरळ। टोंकताहे तुजलागी दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवू रे नेत्री घालीं पडळ ॥८॥ ऐसी ती कृपावंते बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणे त.....

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग