तुजवांचोनि कांही गोड
1608.
तुजवांचोनि कांही गोड न वाटे जीवा | मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥
लौकिकापासुनि कधी सोडविसी | सांग हृषिकेशी उघडोनि ॥२॥
तुझे पाय दिव्य तुझे पाय दिव्य | तुझे पाय दिव्य रे दातारा ॥३॥
नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा| तुझे पाय केशवा दिव्य मज ॥४॥
