किती देवा तुला यावे
1610.
किती देवा तुला यावे काकुलती | काय या संचिती लिहिले असे ॥१॥
केली कांहो सांडी माझी हृषिकेशी | आम्ही कोणापाशी तोंड वासू ॥२॥
ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनी | तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥
समूळ घेतला पृथ्वीचा भार | माझाचि जोजार काय तुला ॥४॥
नको पाहू अंत पांडुरंगे आई| नामा विठोपायी मिठी घाली ॥५॥
