वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

ऐसे म्हणशील कोण । ज्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086082 · अभंग क्र. १६१९

1619.
ऐसे म्हणशील कोण । ज्याचे गाता नामभिधान । देवाधि देव आपण । स्वमुखें सांगे उद्धवा ॥१॥
नारद पराशर पुंडलीक । व्यास शुक वाल्मिकादिक । ध्रुव उपमन्यु भीष्मादिक । वंद्य जाण उद्धवा ॥२॥
वासिष्ठ वामदेव विश्वामित्र । आत्रि दत्तात्रेय पवित्र । ऐसे पुण्यश्लोक सर्वत्र । ते तुज वंद्य उद्धवा ॥३॥
रघु दिलीप हरिश्चंद्र । शीभ्रीराज बली थोर । जयाचा अंकित मी निर्धार । हे तू जाणे उद्धवा ॥४॥
पांडव माझे पंचप्राण । कायावाचा वेचिलें मन । मज निर्धारितां पूर्ण । जीव वेंचिला उद्धवा ॥५॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञाबकळा आपण । इहीं अवतार धरुन । जग तारिले उद्धवा ॥६॥
गोरा सांवता जगमित्र । चोखा रोहिदास कबीर । हे माझे प्राणमित्र । आहेस जाण उद्धवा ॥७॥
दामा नामा जनाबाई । राजाई आणि गोणाई । येशि आणि साकाराई । जिवलग माझे उद्धवा ॥८॥
कान्हुअपात्रा जन जसवंत । हनुमंतादि समस्त । पाठक कान्हा आनंदभरित । तयाचेनि उद्धवा ॥९॥
परसा भागवत सुरदास । वत्सरा आणि कुर्मदास । एका जनार्दनी निजदास । संतांचा मी उद्धवा ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग