आले आले हरीचे दास ।
1601.
आले आले हरीचे दास । मुखी रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥
वैराग्याचे कवच अंगी । नाचताती प्रेमरंगी । ज्ञान शस्त्र ते निसंगीं । छेदिती संग ॥२॥
अनुभव तीक्ष्ण शर । सोडिताती निरंतर । वर्मी खोचले ते वीर । क्रोधादि असुर ॥३॥
सांडोनि देहाभिमान । तोचि जीवन्मुक्त जाण । एका जनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥४॥
