वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

मज कोनी न देखावें ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086046 · अभंग क्र. १५९९

1599.
मज कोनी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥
मान देखोनिया दृष्टी । पळे देह उपेक्षा पोटी ॥२॥
मी एक लौकिकी आहे । ऐसे कवणा ठावें नोहे ॥३॥
सांडावया अहं ममता । मान न पाहे सर्वथा ॥४॥
त्याचे पोटी दृढ अभिमान । तो सदा इच्छि सन्मान ॥५॥
सन्मान घ्यावया सर्वथा । ज्ञातेपण मिरवी वृथा ॥६॥
ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग