तुझे नित्य सुख घ्याव
1631.
तुझे नित्य सुख घ्यावे येणे मने । असावे संधाने चरणाचेनि ।।१।।
वासने विरहित होऊनि एकवट । असावे निकट संतसंगे ।।२।।
ऐशी मज कृपा करी गा विठ्ठला । म्हणविसी आपुला दास जरी ।।३।।
श्रवर्णी तुझे नाम ऐकार्वे आवड़ी। चित्ते देऊनि बुडी प्रेमडोही ।।४।।
नयनी तुझे रूप देखावे सर्वत्र। व्हावे भूतमात्र सखे माझे ।।५।।
वदनी तुझे नाम गावे निर्विकल्प । धरोनि तुझे रूप हृदयकमळी ।।६।।
काया संतचरणी जावी लोटांगणी । ते भाग्य अनुदिनी देई बापा ।।७।।
हेचि माझे व्रत हेंचि तपतीर्थ । करावे दास्यत्व संतांचे हे ।।८।।
अनुदिनी व्हावा संतांचा हा संग । असावा अनुराग कीर्तनाचा ।।९।।
मानाचा मज ओस अपमार्नी उल्हास । देई तुझा ध्यास सर्वकाळ ।।१०।।
नामा म्हणे विठोबा तरीच शरणागत । नाही तरी पतित म्हणती मज ।।११।।
