काय अपराध पाहसी कोणा
1629.
काय अपराध पाहसी कोणाचे | धांवे भाविकांचे कामकाजी ॥१॥
काय केशिराजा वाणू मी दुबळे | शरणागता लळे पुरविशी ॥२॥
पतितपावन ब्रीद चराचरी | तेथे मी भिकारी कोणीकडे ॥३॥
नामा म्हणे तूंचि करिशी उद्धार | मज भाग्या पार नाही देवा ॥४॥